प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - व्यवहारी अपूर्णांक : समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - गणित 

घटक - व्यवहारी अपूर्णांक : समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम 





प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ४ थी) गणित विषयामध्ये 'व्यवहारी अपूर्णांक' हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारित अपूर्णांकांचा लहान-मोठेपणा ठरवणे, चढता-उतरता क्रम लावणे यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. आज आपण या घटकाच्या सोप्या क्लृप्त्या समजून घेणार आहोत.


१. समच्छेद अपूर्णांक : ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात, त्यांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात.

नियम: छेद समान असल्यास, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.

उदाहरण: 5/8 आणि 3/8 मध्ये 5/8 > 3/8


२. भिन्नछेद अपूर्णांक : ज्या अपूर्णांकांचे छेद असमान असतात, त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात.

नियम १ (अंश समान असल्यास): जर अंश समान असतील, तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

उदाहरण: 4/7 आणि 4/9 मध्ये 4/7 > 4/9 आहे.

नियम २ (तिरकस गुणाकार पद्धत): छेद व अंश दोन्ही वेगळे असल्यास तिरकस गुणाकार करावा.

उदाहरण: 2/3 आणि 3/5  ची तुलना करताना:

2 × 5 = 10 आणि 3 × 3 = 9

10 > 9 असल्यामुळे 2/3 > 3/5 ठरते.


३. अपूर्णांकांचा चढता व उतरता क्रम:

चढता क्रम: लहानाकडून मोठ्या संख्येकडे.

उतरता क्रम: मोठ्याकडून लहान संख्येकडे.

उदाहरण (छेद समान असल्यास): 1/9, 5/9, 3/9

 चढता क्रम: 1/9, 3/9, 5/9

उतरता क्रम: 5/9, 3/9, 1/9



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم