प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - लिंग
ज्या नामावरून ते पुरुषजातीचे ( नर ) आहे की स्त्रीजातीचे (मादी) आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही हे आपल्याला कळते; त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.
१) पुल्लिंग :
- ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो, ते पुल्लिंग असते.
- 'तो' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे.
- उदा. तो-मुलगा, तो-घोडा, तो-फळा, तो-चिमणा, तो-मृत्यू, तो-चांगुलपणा
- ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, ते स्त्रीलिंग असते.
- 'ती' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते स्त्रीलिंगी मानावे.
- उदा. ती-मुलगी,ती-घोडी, ती-फळी, ती-चिमणी, ती-वही
- ज्या नामावरून पुरुषजातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते.
- 'ते' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते नपुंसक लिंगी मानावे.
- उदा. ते-मूल, ते- फूल, ते- पुस्तक, ते-वासरू, ते-गवत, ते-धैर्य
पुल्लिंगी -स्त्रीलिंगी
नवरा - बायको
वडील - आई
भाऊ - बहीण
बैल - गाय
चिमणा - चिमणी
पोपट - पोपटीण
बोकड - शेळी
मुलगा - मुलगी
देव - देवी
सासरा - सासू
राजा - राणी
आजोबा - आजी
काका - काकी
मामा - मामी
लेखक - लेखिका
शेतकरी - शेतकरीण
शिक्षक - शिक्षिका
गाडा - गाडी
दोर - दोरी
डॉक्टर - डॉक्टरीण
💥 अनेकवचनी किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही ते नाम एकवचनी करूनच त्याचे लिंग ओळखावे.
वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.
